एन क्यू एस मानक मिळवणारे राज्यातील एकमेव स्पर्श ग्रामिण रुग्णालय सास्तूर



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- केंद्रीय आरोया व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एन क्यू एस) महाराष्ट्रातील ग्रामीण रुग्णालयांमधून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालय स्पर्श या राज्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयाला दर्जात्मक आयरोग्य सेवेसाठी दिला जाणारा हा अतिशय मनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे नवी दिल्ली येथे डॉ.रॅम मनोहर लोहिया  रुग्णालयाच्या सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आश्विनी कुमार चोबे यांच्या हस्ते उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले,व ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी हा मनाचा पुरस्कार स्वीकारला.सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता विषयावरील राष्ट्रीय परिषदेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या कार्यकारी संचालक डॉ.राजांनी देव,डॉ.राम मनोहर लोहिया  रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.के.तिवारी या वेळी मंचावर उपस्थित होते.मनोज तिवारी कार्यकारी संचालक एन.एच.एम.केंद्र सरकार,केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एन क्यू एस मानक मिळणाऱ्या देशातील विविध राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सातत्यपूर्ण,दर्जेदार,आपुलकी व तळमळीची आरोग्य सेवा गेली 21 वर्षे ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) ने ग्रामीण भागातील गरीब व गरजू जनतेला पुरवली आहे.याची पाहणी करून व दखल घेऊन केंद्र शासनाने हा मनाचा एन क्यू एस मानक पुरस्कार ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्शला दिला.व गेली 21 वर्ष येथील तज्ञ डॉक्टर्स,कर्मचारी यांनी केलेल्या सकारात्मक आरोग्य सेवेचे हे फळ आहे.व या पुरस्काराने तशी पावतीच मिळाली आहे.असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय सास्तूर व स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी याना हा पुरस्कार मिळाल्या नंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post