नळदुर्ग नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन कासार हे आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत नसल्याच्या कारणावरुन पालिकेतील दहा नगरसेवकांनी उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी नगराधक्षांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी एका लेखी निवेदनादवारे नगराध्यक्षांकडे करण्यात आली आहे.



 उमरगा तालुका (प्रतिनिधी) चेतन पवार
नळदुर्ग नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन कासार हे आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत नसल्याच्या कारणावरुन पालिकेतील दहा नगरसेवकांनी उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी नगराधक्षांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी एका लेखी निवेदनादवारे नगराध्यक्षांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन दि. 2 एप्रील रोजी पालिकेत देण्यात आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्यावर विश्वास ठेवून शहरातील मतदारांनी गेल्या दिड वर्षापूर्वी पालिकेची सत्ता त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिली होती मात्र आता बारा पैंकी पाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीच अविश्वास आणण्यासाठी पुढचे पाउल उचलले आहे त्यामुळे मे महिन्यातच विधानरिषदेची निवडणूक लागली आहे आणि या 6निवडणुकीसाठी अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चीत उमेदवार मानले जात आसतानाच त्यांच्याच पालिकेत  आता पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विरोधात जात आसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपनगराध्यक्ष नितीन कासार हे आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत, त्या ठिकाणी शहरातील नागरीकांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उपनगराध्यक्षांची नितांत गरज आहे, त्यामुळे नितीन कासार हे आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत नसल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने आम्ही सर्व नगरसेवक उपनगराध्यक्षावर अविश्वास आणू इच्छीत आहोत असे ही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेचे विदयमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नगरसेविका सौ. आंबूबाई दासकर, सौ. भारती बनसोडे, सौ. शाहीन जुल्फेकार मासुलदार, सौ. सुनंदा राजू जाधव या पाच नगरसेवकांनी तर काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेते नय्यर जहागिरदार, माजी नगराधयक्ष तथा नगरसेवक शहेबाज काझी, बसवराज धरणे, सुफीया कुरेशी, मन्नाबी गफार कुरेशी या पाच असे दहा नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत पालिका आसताना याच सत्तेतीलच पाच नगरसेवक या अविश्वास दर्शक ठरावाला पाठींबा देत आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसेच आगामी गणीत कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पुढील महिन्यात उस्मानाबाद, लातूर आणि बीड या तीन जिल्हयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणुक होणार आहे, या निवडणुकीत नळदुर्गचे भुमीपूत्र ज्यांच्या हातात नळदुर्गवाशीयांनी पालिकेची एक हाती सत्ता दिली आहे ते अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची निवडणुक लढविणार आहेत, एैन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विरोधात जाणे म्हणजे त्यांच्या आस्तीत्वाला धक्का पोहंचविण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post