प्रकाश श्रीवास
मूर्तीजापुर दि.२ (तालुका प्रतिनिधी) दुर्ग येथे मागील काही दिवसांपूर्वी सिंधी समाजाचे दोन युवा विध्यार्थी ना पोलिसांनी एका पत्रकाराच्या सांगण्यावरून भर बाजारात हातकडया घालून फिरविल्यामुळे समाजाच्या भावना दूखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा मूर्तीजापुर सिंधी पंचायतने निषेध नोंदवून एक निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देवुन कार्यवाही ची मागणी केली आहे. दुर्ग येथे सिंधी समाजाचे दोन युवकांना तेथील पोलिसांनी एका पत्रकाराच्या सांगण्यावरून हातकडया टाकून भर बाजारात फिरवून समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर त्याना मानसिक व शारीरिक त्रास देवुन अपमान करणे, तसेच नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाने सिंधी समाजाला पाकीस्तानी आतंकवादी म्हणून संबोधले या सर्व घटनेमुळे सिंधी समाजाच्या भावनेस इजा पोहचून त्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
संपूर्ण घटनेचा पुज्य सिंधी पंचायत मूर्तीजापुर च्या वतीने निषेध नोंदवून झूलेलाल मंदिर सिंधी कँम्प येथून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने यांना आपल्या मागणीचे निवेदन देवुन नागपूर येथून प्रकाशित दैनिक व पोलीस अधिकारी विरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मूर्तीजापुर सिंधी समाजाचे बहुतांश समाज बांधव उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती नवी दिल्ली, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री मुंबई, मुख्यमंत्री छतीसगड, जिल्हाधिकारी दुर्ग याना ही देण्यात आल्या आहेत.

