निष्पाप मुलीवर बलात्कार करून खून करणारेंस फासी द्या व पिडीतांच्या वकीलांना संरक्षण देण्याची मागणी




जिल्हा प्रतिनिधि,मक़सूद अली यवतमाळ :- बाभूळगाव: उन्नव, युपी, जम्मुकश्मीर, सुरत येथील निश्पाप मुलींवर बलात्कार करून खुन करणारें आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व पिडिता व त्यांचे वकीलास संरक्षण देण्याची मागणी बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बलात्कार व हत्या  प्रकरणातील आरोपीचे समर्थन करणारेही तेवढेच दोषी असून त्यांचेवरही कठोर कारवाई करावी असेही निवेदनात नमुद केले आहे. यावेळी मो.जावेद मो.रफीक, सुधाकर खोब्रागडे, शहेजाद शेख, आकाश रीयज गुप्ता, हेमंत बोरकर, शे फैजन शे. फरीद, स्वनील दातार, गौरव सीडाम, राजीक खान तालेवन खान, नाजीम खान जलील खान, शे फारूख शे कदीर रहीनभाई, शे नईम शे रशीद, प्रविण लांजेंवार, शहरूख खान पठाण, सलमान खान जानाब खान, आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post