आता निवांत बसताना पारावर
पिंपळपान सुद्धा हलत नाही वा-यावर
त्याच चित्तच नसत था-यावर
भुतकाळात पसार झालेलं मन
तुलाच शोधत फिरतं गावभर
तू तुझ्या दारात दिसायचीस तेव्हा
मला पार ताजमहाल वाटायचा
डोळ्यात तुला साठवत मी तिथच बसायचा
तुझं वागण व्हायच सैरभैर
तुला बघून जीव हसायचा रुसायचा
दिवस जगण पोखरत गेले
कुणी तरी अनोळखी राजकुमार आले
माझ्याच स्वप्नमेन्यातून तुला
अलगद उचलून नेले
बघताना चार डोळे
ओलेचिंब झाले
गुपित उघड करायच कस
दोघांचही नको व्हयला हसं
पिंपळ आता थोराड झालाय
पाराला आडवा तडा गेलाय
पण आठवांनी कुठं पाठलाग सोडलाय
आज नवीन पोर पारावर बसतात
कुणाच्या तरी नजरभेटी घडतातं
तेव्हा माझं मन खरच खचतं
इतिहास जमा झालेल नातं
सांभाळारे बाबानो म्हणून हसतं
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७
