नको नको रे माणसा



नको नको रे माणसा
नको करु पाप.
पोट भरण्या स्वतःच
करु नको हापहाप!!

नको तोडू झाड
कुठ जातील ही मुकी.
होतात किती कष्टी
होतील किती दुःखी !!

काढ बाजुला तुझ्या
अन्नातला घास.
टिचभर पोटासाठी
किती पडतो रे ञास!!

नको नको सांडू
लई मोलाच रे पाणी.
जीरव जमिनीत 
होईल आबादाणी!!

लावून एकेक झाड
जप जीवापाड.
तेच धरिल मायेन
सावली डोई गाढ!!

तुला दिली रे देवान
लाख मोलाची सृष्टी.
नको करु र्हास
बदल आता दृष्टी!!


किरण बागल.
लासलगाव (नाशिक)

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post