चल उठ रे गड्या



चल उठ रे गड्या
सोड आता राग.
करु नको येडेपणा
जरा शहाण्यासारख वाग!!

संपल्या आता परीक्षा 
शाळेलाही सुट्टी.
म्हटल जरा जमवू
आपण दोघ गट्टी.

मजा करु रानात
आपण दोघ दोस्त.
काम करतो नेहमीच
उड्या मारु मस्त!!

रानातल्या मला 
दाव गमतीजमती.
मीही सांगतो तुला
शाळेतली मस्ती!!

राबतोस धन्यासोबत
उपसतो कष्ट.
कष्टातल्या यशाची
सांग ना गोष्ट!!

माहीत आहे काम करुन
तुही दमतो रे.
तुझ्याशिवाय मग माझा
जीव कुठं रमतो रे!!


किरण बागल.
लासलगाव.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post