लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी
साहेबांचा फोन आला
सिमेवर चकमक सुरु झाली आणि मी तसाच निघालो
तिच्या कपाळावरचा कुकूं पुसून
जाताना मागे वळुन बघण्याची
हिम्मंत झाली नाही
ती तशीच धावत आली
पाठीमागुन मिठी मारली
परत कधी येणार म्हणून
विचारू लागली
सांगता आले नाही
तिच्या पदराला परत येण्याचे वचन बांधुन
एकमात्र निश्चीत सांगितले
परत आलो तर पुन्हा तुझ्या कपाळाला कुकूं लाविन
मी येईपर्यंत तु स्वताला आरशात
विधवा होऊन बघतं जा
वर्ष निघुन गेले ति तशीचं
कुकूं सांभाळून वाट पहात होती
मी जेव्हा परत आलो तेव्हा
तिच्या पदराला बादलेली वचनाची गाठ सोडली आणि
लावला तिच्या कपाळाला
भारत मातेच्या चरणाचा कुकूं
आताकुठे मुलगा मोठा झाला
बापाशी बोलायला लगला
अशातच साहेबांचा फोन आला
सिमेवर चकमक सुरु झाली
आणि मी तसाचं निघालो
काहीन बोलता पण..
मागे वळुन पाहुशकत् नव्हतो लेकराला
पोरगा तसाच धावत आला
पायला बिलगला आणि म्हणाला
बाबा तुम्ही लवकर या
येताना भारत मातेलाच घेऊन या
म्हणजे पुन्हा चकमक होणार नाही आणि....
आईला पाढंरे कपाळ करून पुन्हा आरशात बघाव लागणार नाही
अश्रु डोळ्यातुन बाहेर येऊन देता
मुलाला समजाऊन सांगितले
तुला जशी आईची गरज आहे
तशीच भारत मातेला माझी
गरज आहे
परत आलो तर भारत मातेच्या चरणाचा कुकूं त्या कपाळी लावनार
त्यानंतर घरात आरसा कधीच नाही दिसनार
संजय धनगव्हाळ
