चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) :- उमरगा तालुक्यातील आलूर येथे आज दि.19 रोजी सकाळी नऊच्या सुमारास महात्मा बसवेश्वर चौकपासून मूक मोर्चा निघून मशीद - ग्रामपंचायत कार्यालय- लक्ष्मी मंदिर-जि प मुलींची शाळा-भीम नगर- प्राथमिक आरोग्य केंद्र- लमाण वस्ती मार्गे बसस्टँडवर मूक मोर्चा धडकला. गावातून मुख्य रस्त्यावर जस्टिस फॉर असिफा असे हातात बोर्ड घेऊन सर्व जाती-धर्मातील लोकांनी मिळून मूक मोर्चा काढले.यामुक मोर्चेमध्ये लहान लहान मुले-मुली, पंचायत समिती सदस्य पती गुलाब राठोड, उपसरपंच राजकुमार माने, नागेश पाटील, नागण्णा ब्याळीकुळे,अब्दुल रहेमान हाफीसाब, महांतय्या स्वामी, हणमंत भालके, निजाम हुच्चे, परवेज सौदागर, चंद्रकांत शंके, राजकुमार मडीवाळ, जावेद खडखडे, हणमंत शंके, नदीम मुर्शद, सत्तार सयदल्ली, मेराजुल उलूम उर्दू शाळेतील व गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलीसह शिवा संघटना, जनहित सामाजिक संस्था व बसव अनुभव मंटपचे सर्व पदाधिकारी आणि गावातील शेकडो लोक या मूक मोर्चेत सहभागी झाले होते.
यावेळी उपसरपंच राजकुमार माने, नागेश पाटील, रहेमान हाफीसाब व निजाम हुच्चे आदींची जनजागृतीपर भाषणे झाली, त्यानंतर मुरूम पोलीस उपनिरीक्षक डि पि सानप यांना असिफाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी व दोषींवर कडक कारवाही करण्यासाठी आलूर वाशियांकडून निवेदन देण्यात आले.नागेश पाटील- आपल्या मुला मुलींना शिक्षणासोबत संरक्षण करण्यासाठीचे बळ व आत्मविश्वस द्या.
रहेमान हाफीसाब- प्रत्येकांच्या घरात इतरांचे आदर व सन्मान करण्यासारखे संस्कार द्या.असे भाषणाच्या दरम्यान लोकांना आवाहन केले.