बाभुळगाव बसस्थानाकातून महिलेचा पर्स लंपास


प्रतिनिधी मुस्तफा खान
यवतमाळ/बाभुळगाव  :- बाभुळगाव - येथील बसस्थानाकात बसमधील महिलेची पर्स लंपास करण्यात आली याप्रकरणी पोलिसांनी दोन महिल्यांना ताब्यात घेतले. यवतमाळ येथील मिनाशि बोरकर ही महिला एका विवाह सोहळयासाठी बुधवारी येथे आली होती. लग्नसोहळा आटोपून त्या यवतमाळला जाण्यासाठी बसस्थानाकात आल्या.  बसमध्ये चढताना गर्दीचा लाभ उचलुन चोरट्यांनी त्याची पर्स लंपास केली. त्यात ८०हजार रूपयाचे मुद्देमाल होता. मिनाशि बोरकर यांनी बसमध्ये आरडाओरडा केला. तेथे असलेल्या पोलिसांनी दोन संशयीत  महिल्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ६०हजार रुपये ठेवून असलेली पर्स आढळली या संशयीत महिलामध्ये मालाबाई मनवर मानकर (३०)आणि कोमल उमेश रोकडे(२१) दोन्ही रा. रामेश्वरी रिग रोड अंजनी नागपुर येथील ही महिला  रहेवाशी आहे. त्यांच्या  विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post