सैय्यद मुजीबोद्दीन,
पुसद यवतमाळ :- पुसद तालुक्यात सदर कार्यक्रम साजरा करण्या पूर्वी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज व देवतुल्य स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
बंजारा विश्व दिवस का साजरा करण्यात येत आहे, या दिवसाचे महत्व काय आहे, ८ एप्रिल लाच का साजरा करण्यात येते, या दिवसा चे महत्व अखिल भारतीय बंजारा युवा सेने चे विदर्भ अध्यक्ष जिनकर राठोड यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणाततुन सांगितले. ८ एप्रिल या दिवशी युरोप खंडातील रोम या देशातील बंजारा बांधव एकत्र येऊन संघटना स्थापन केले होते. आणि या दिवशी बंजारा समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र आले म्हणून हा दिवस बंजारा विश्व दिवस म्हणून साजरा करूया असे जाहीर करण्यात आले होते त्या नंतर सर्व प्रथम मध्यप्रदेश या राज्यात ८ एप्रिल २००७ ला विश्व बंजारा दिवस साजरा करण्यात आले.
तेव्हा पासून आज पर्यन्त दरवर्षी साजरा करतात पण आपल्या महाराष्ट्रात सर्व प्रथम म्हणजे दिनांक ८ एप्रिल २०१८ ला साजरा करण्यात येत आहे. असे जिनकर राठोड यांनी समाजाला बंजारा विश्व दिनानिमित्य मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला अखिल भारतीय बंजारा युवा सेने चे विदर्भ संपर्क प्रमुख संजय आडे, पुसद तालुका अध्यक्ष डॉ मोतीराम चव्हाण, महागाव तालुका अध्यक्ष संजय राठोड, रमेश राठोड, सौ सुंदरीबाई आडे, सौ मालुबाई राठोड, किरण राठोड पंजाब राठोड,योगेश जाधव, श्रीराम जाधव, नवीन राठोड, सतीश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संजय आडे यांनी केले.