एप्रीलला दिव्यांगाचा अर्धनग्न आंदोलन मोर्चा पालकमंत्रीच्या निवासवर धडणार


यवतमाळ :- जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीच्या प्रमुख नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दिव्यांगासाठी कार्यरत दिव्यांग संघटनाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या मिळणारे मानधनात दिव्यांगाची 80 ते 100 टक्केवारी असलेल्या  दिव्यांग व्यक्तीला 3000 रू मानधन व 60 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तीला 2000 रूपये तर 40 ते 60 टक्के दिव्यांग व्यक्तीला 1000 रूपये मानधन वाढ करावे, एका घरात एकापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांनी प्रती व्यक्ती मानधन मिळावे, तसेच महसुल व वन विभागाच्या शासन निर्णयनुसार अपंगाना लाभामध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागण्यासह दिव्यांगाच्या इतर मागण्यासाठी 27 एप्रील रोजी दिव्यांगाच्या हक्कासाठी अर्धनग्न आंदोलन मोर्चा पालकमंत्री यांचे निवासस्थानी आयोजित केला आहे.
या मोर्चात दिव्यांग जनक्रांती संघटना म.रा., उत्थान तालुकास्तरीय संघटना बाभुळगाव, यवतमाळ जिल्हा विकलांग मंच, अपंग जनता दल यवतमाळ, प्रहार अपंग क्रांती संघटना यवतमाळ, परिवर्तन विकलांग संघ घाटंजी, संघर्ष तालुका  विकलांग संघ वणी, निर्धार तालुका अपंग गट राळेगाव, प्रहार अपंग तालुका गट आणी, उन्नती तालुका अपंग गट यवतमाळ, मुक बधीर असोसिएशन यवतमाळ, आदी यात सहभागी होतील. 27 एप्रीलला बसस्थानक चौक डॉ.आंबेडकर पुतळाजवळ 12 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्रूांग संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत जाधव, रोहीदास जाधव, कांता सुतार, अनुसया थेरे, मुरलीधर जाधव, विजय गडदणे, सलीम कुरेशी, सतिष आडे, प्रकाश पुरोहीत, अंबादास कदम, गजानन भांडवलकर, प्रशांत कलांद्रे, रेखा धांडे, गंगाधर गोटे, शुध्दोधन खाडे आदीनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post