सैय्यद मुजीबोद्दीन
पुसद यवतमाळ :- रोडा नाईक तांडा ता किनवट जिल्हा नांदेड येथील बंजारा समाजातील अल्पवयीन मुलगीवर केलेल्या अत्याचार व त्यांचा कुटुंबियास जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अनंत धारूजी डुडुळे यास अटक करून त्याला फाशी देण्याची मागणी अखिल भारतीय बंजारा युवा सेना सामाजिक संघटने कडुन करण्यात आली आहे.सदर मागणी बाबत उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले या वेळी अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख संजय दशरथ आडे. बंजारा युवा सेनेचे यवतमाळ जिल्हा कार्याधक्ष संजय मदन आडे. बंजारा युवा सेनेचे पुसद तालुका अध्यक्ष मोतीराम चव्हाण. बंजारा युवा सेनेचे पुसद शहर अध्यक्ष रमेश राठोड. बंजारा युवा सेनेचे विभाग प्रमुख समाधान राठोड. प्रविण राठोड आदी उपस्थित होते.
