जितेश कारिया
हिवरखेड येथील प्रतिष्ठित नागरिक श्री नंदकिशोरजी नथमलजी लाखोटिया यांच्या धर्मपत्नी स्व. कमलाबाई नंदकिशोरजी लाखोटिया यांच्या स्मुतीप्रित्यर्थ अंदाजे खर्च ५१०००/- रुपयाच्या वॉटर कुलर पाणपोईचे उद्घाटन रामनवमीदिनीच्या रथावरील बालहनुमान चि.भाविक जितेंद्र लाखोटिया यांच्या हस्ते हनुमान जयंतीचे शुभपर्वावर श्री विठ्ठल मंदिर संस्थान , हिवरखेड येथे संपन्न झाले. यावेळी संस्थानचे विश्वस्त सत्यदेवराव गिऱ्हे, अनिल भाेपळे, श्रीराम व्यवहारे, संजय मानके , सत्यदेव अग्रवाल , जितेंद्र लाखोटिया, नंदकिशोर अग्रवाल ह.भ.प.नागपूरे महाराज, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या शाखाधिकारी वानखडे मॅडम , गोडले, काेडापे साहेब, नवलकिशोर लाखोटिया,गोवर्धन गावंडे, प्रकाश बोंबटकर, सुरेश कराळे, प्रविण देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या दरम्यान तेल्हारा पंचायत समिती चे माजी सभापती दादासाहेब भोपळे यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला. यावेळी लाखोटिया कुटुंबियांचे गावकऱ्यांच्या वतीने प्रा. संतोष राऊत यांनी आभार व्यक्त केले.
