धानुरी ते करजगाव पाणंद रस्ता कागदावरच दाखवुन काम न करता एकुण 47 लाख 74 हजार रुपये हडप केली.या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी — बसव प्रतिष्ठाणचे रामलिंग पुराणे यांनी केली आहे.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव येथील पाणंद रस्ता रक्कम 47 लाख 74 हजार रुपयेचा कागदावरच केला गेला आहे.या रस्त्याच्या  भ्रष्टाचाराची त्वरित उच्चस्तरीय चौकशी करुन सबंधीतावर योग्य ती कार्यवाही करावी,अशा मागणीचे निवेदन बसव प्रतिष्ठाण चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रामलिंग पुराणे(मुरुम) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला आहे.मुरूम-आलूर रस्ता भ्रष्टाचारा नंतर आता लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव हे पाणंद रस्ता सन 2013—14 ते 2016—17 या वर्षात विविध योजनेतून एक टोपलेही न टाकता तब्बल 47 लाख 74 हजार रुपयेचा काम कागदावरच उरकण्यात आले आहे.वेळोवेळी मुरूम,खडी, डांबरीकरण अशा रस्त्याची प्रक्रिया हि कागदावर उरकून तब्बल 47 लक्ष 74 हजार रुपये रक्कम संबधित अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून हडपण्यात आले आहे.यामध्ये कामाचे तुकडे पाडून ठराविक संस्थेलाच काम देण्यात आले आहे.धानुरी ग्रामपंचायत व एका संस्थेने हे काम केल्याचे  कागदोपत्री दाखवून पैसे हाडप करण्यात आले आहेत.सदरील धानुरी करजगाव रस्ता अद्याप पाणंद मुक्त झालेला नाही.फक्त कागदोपत्री कामे दाखवून पैसे हडपण्यात आले आहे.
मुळात रस्ताच बनला नाही आणि कागदावर रस्ता बनवला असे दाखवून बिलाची रक्कम उचलण्यात आली आहे.यामुळे येथील शेतकरी बांधवना आजही रस्त्या विना पायपीट करावी लागत आहे.तरी सदरील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबधित अधिकारी यांना निलंबीत करण्यात यावे.व कंत्राटीदाराचे परवाना तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत,अन्यथा बसव प्रतिष्ठाण च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.असे निवेदनात म्हटले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post