तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय 22 याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. 23 मार्च ला सकाळी 10 वाजता घडली. हिवरखेड पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. बेलखेड येथील गणेश श्रीकृष्ण माळोकार वय 22 ह्या युवकाकडे वडिलोपार्जित 2 एकर शेत व लागवण चे केलेल्या शेतात खरीपात कपाशी पिक झाले नाही त्यानंतर रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्पादन दिसत नसल्याने हरभरा सोगणी करून शेतातून परत येताच सदर युवकाने आपल्या राहत्या घरी घळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहीती हिवरखेड पोलिसांना दिली त्यावरून बिट जमादार राजु इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. गणेश हा मनमिळाऊ स्वभावाचा एकुलता एक मुलगा होता. तेल्हारा वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला. बेलखेड येथे मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेलखेड येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या.