इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- इसरूळ (जि. बुलढाणा) येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या पोलिस निरीक्षावर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी लोहारा लहुजी शक्ती सेना व लोहारा तालुका रिपब्लिकन पक्षाने केली आहे. याबाबत नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना दि.23 मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. इसरुळ (ता.चिखली जि.बुलढाणा) येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची पोलिस निरीक्षक काळेगावकर यांनी तोडफोड करुन विटंबना केली आहे.यामुळे महाराष्ट्रातील तमाम मातंग व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,अन्यथा समाज बांधवाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा निवेदनात दिला आहे.या निवेदनावर रिपाइं तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे,लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष दीपक प्रकाश रोडगे,अक्षय सगट,लक्ष्मण कुंडलीक सगट,रवि पवार,उत्तम भालेराव,डी.पी कांबळे,दत्ताभाऊ गायकवाड,बालाजी माटे,दिनेश मोरे,बालाजी कसबे,हणमंत रोडगे,संदीप सातपुते, सुमित महाणूर,तानाजी माटे,दत्ताभाऊ,यशवंत मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
