महिला सशक्तीकरण सप्ताहाच्या निमित्ताने एमपीजेच्या वतीने कर्तुत्ववान महीलांचा गाैरव




मस्कसुद अली 
यवतमाळ :. मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअरच्या वतीने जागतीक महीला दिवसा पासून महिला सशक्तीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते नुकतेच अंबर लॉन येथील कार्यक्रमाद्वारे समापन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागपूर येथील एमपीजेच्या महिला विंगच्या महाराष्ट्र सेक्रेटरी श्रीमती डॉ.तसनीम बानो ह्या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून
माणकापूर च्या सरपंचा प्राध्यापिका वर्षाताई निकम होत्या.महिलांची शैक्षणिक स्थिती याविषयावर सखोल असे मार्गदर्शन करतांना त्यांनी शिक्षणात स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे मुला प्रमाणेच मुलीला शिक्षणाची समान संधी देऊन पुढच्या पिढी समोर आदर्श प्रस्थापीत करावं असे आवाहन देखील केले.
वक्त्यांनी महिलांची सामाजिक व आर्थिक स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.  यावेळी
विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणार्या कर्तुत्ववान महीलांचा सत्कार देखील करण्यात आला.यात संकल्प बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सोनाली मरगडे,एकच पाय असलेली जिद्दीने पेटलेली शिरीन तबस्सुम,समीना शेख आणि दर्डा कॉलेजच्या प्राध्यापिका संतोषी साहुळकर यांचा प्रमुख अतीथिंच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ
सन्मान चिन्ह देउन  गाैरव करण्यात आला.


     महीलांच्या कर्तुत्वाविषयी  समाजात विशेष जागृकता निर्माण व्हावी व अन्याय अत्याचाराला महिला बळी पडू नये या करीता एमपीजे नेहमीच पुढाकार घेत असल्याची माहिती यवतमाळच्या महिला विंग च्या अध्यक्षा समीना खालीक शेख यांनी आपल्या प्रास्ताविकातुन दिली. यावेळी नांदेड येथील अल्ताफ हुसैन व एमपीजेचे प्रदेश सचीव हुसैन खान प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअर चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष
प्रा. सय्यद मोहसीन,शोएब साहीर,नदीम पटेल सर,एहतेशाम साहीर,शहर अध्यक्ष वसीम खान,खालीक शेख,आर्णी येथील शबाना खान,सौ.पूजा रामटेके,डॉ.स्वाती पदमावार,अफसाना शेख,मकसूद अली,अजीत बोरकर व ज्येष्ठ मार्गदर्शक जिया मिनाई,रियाज हुसैन सिद्दीकी, अल्ताफ सर व ख्वाजा साहीर आदींनी परिश्रम केले. कार्यक्रमाला बहुसंख्य महिला, विद्यार्थीनी उपस्थित हाेते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post