पदाची गरीमा मलीन करणारे अधिष्ठाता डॉ.श्रीगीरीवार यांना तत्काळ निलंबीत करावे: शाज अहेमद



मक़सूद अली 
यवतमाळ: येथील श्री वसंतराव नाईक शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू असलेल्या मनमानी कारभाराची तक्रार ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुस्लीमीन यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शाज अहेमद यांचे नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रभारी अधिष्ठाता डॉ.श्रीगीरीवार रूजू झाल्यापासून मनमानी कारभार सुरू आहे. संपूर्ण देशात बंजारा समाज व विशेषत: विदर्भात श्री सेवालाल महाराज यांना मानणारा समाज आहे, असे असताना अधिष्ठाता यांनी श्री सेवालाल महाराज जयंती साजरी न करून त्यांची शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केले, हा प्रकाकर त्यांनी जाणुनबुजून केल्याचा आरोप शाज अहेमद यांनी केला. मनात जातीय भेद ठेवून रूग्णालय सारखे जागेवर अधिष्ठाता आपल्या जातीय विचारांनी विष कालवीत आहेत, यातील दोषी अधिष्ठाता व त्यांचे लघुलेखक कुंभारकर यांचेवर कार्यवाही न झाल्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. डॉ.श्रीगीरीवार आपला वाढदिवस साजरा करण्याकरीता विभागातील शासकीय यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी यांचा दुरूपयोग करतात, ही बाब गंभीर असल्याने त्यांचेवर त्वरीक निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून मुख्यमंत्री, वैद्यकीय व शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, संचालक, जिल्हाधिकारी यांना केली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post