- सोशल मीडिया महामित्रच्या माध्यमातून तरुण सकारात्मक दृष्टीने एकत्र येण्यास चालना-स्पर्धेतील गटचर्चाचा निष्कर्ष.
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत सोशल मीडियाचा महामित्र स्पर्धा राबविली होती.या स्पर्धे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदविला होता उस्मानाबाद जिल्ह्यातुन 4 क्षेत्रांतर्गत हि स्पर्धा घेण्यात आली होती,तर प्रत्येक क्षेत्रातून 10 जणांची उस्मानाबाद येथे सोशल मीडियावर संवादसत्र साठी निवड करून दि.13 मार्च रोजी सेंट्रल बिल्डिंग च्या आवारात ओपन चर्चा (डिबेट)सत्र घेण्यात आले होते.
या गटचर्चांचे परीक्षण व निरीक्षण जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा,टी.व्ही.नाईन चे पत्रकार संतोष जाधव,साहित्यिक राजेंद्र अत्रे,नेहरू विकास केंद्राचे विकास कुलकर्णी,अनुलोम चे जिल्हा प्रमुख संतोष कांबळे (कोळी),महामित्र स्पर्धा चे जिल्हा समन्वयक गणेश कुलकर्णी यांनी केले.
उमरगा लोहारा तालुक्यांतर्गत असलेल्या क्षेत्र स्तरावरून पत्रकार सचिन बिद्री यांचा या स्पर्धेमध्ये संवादसत्रासाठी निवड झाली होती,सचिन बिद्री क्षेत्रस्तरावर प्रथम आणि राज्यपातळीवर 28 वा क्रमांक पटकावला होता,त्यामुळे शहरातून व तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.सदर चर्चा (डीबेट)सत्रामध्येही पत्रकार सचिन बिद्री यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. उस्मानाबाद जिल्ह्यातून भूम,परांडा,तुळजापूर,आणि उमरगा-लोहारा या चार क्षेत्रतून हि सोशल मिडिया महामित्र स्पर्धा घेण्यात आली होती.
सदर चर्चा (डिबेट)सत्रानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा मीहिती अधिकारी मनोज सानप,महामित्र स्पर्धेचे जिल्हा समन्वयक गणेश कुलकर्णी उपस्थित होते.
या झालेल्या चर्चा (डिबेट) सत्र चा निकाल काही दिवसांनी लागणार असून निवड झालेल्या स्पर्धकांना राज्यपातळीवर होणार आहे,त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सहभागी सर्व स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.याशिवाय सहभागी स्पर्धकांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली.तसेच त्यांना लोकराज्य,महाराष्ट्र अहेड,मुद्रा योजनेची आणि बळीराजा चेतना अभियानाची माहिती पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि गणेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
तर राज्य स्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण,मान्यवरांसोबत सेल्पी,कॉफी, आणि आपले विचार मांडण्याची संधी,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत फोटो,पारितोषिके व अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
