विद्यार्थी संसद सचिवपदी बारगळ विनायक याची निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी. एस. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी संसद सचिवपदी विनायक बारगळ याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे सरांच्या हस्ते विनायक बारगळ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठ नियमानुसार 2017-18 साठी बी. एस. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिवपदाच्या निवडीसाठी गुणानुक्रमाणे वर्गप्रतिनिधींची निवड करण्यात आली होती,त्यानंतर सचिव पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते,त्यानुसार बी.एसी.वर्गात शिकणाऱ्या विनायक बारगळ याचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने प्राचार्य डॉ.एच.एन.रेडे सर,निर्णय अधिकारी डॉ.सुधीर मुगळे यांनी विनायक बारगळ याची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post