लोहारा तालुक्यातील कास्ती बु येथील जि.प.कें.प्रा. शाळेतील सह शिक्षक अमोल शिवाजी गेडेवाड पुणे येथील राज्यस्तरीय मँरोथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने यांचे लोहारा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील कास्ती बु येथील जि.प.कें.प्रा.
शाळेतील सह शिक्षक अमोल शिवाजी गेडेवाड पुणे येथील राज्यस्तरीय मँरोथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने यांचे लोहारा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
ब्लु ब्रिगेड व उत्सव बँक्वेटस पुणे सिटी हाफ यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील धावपटुसाठी हि  मँरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलीहोती.या स्पर्धेमध्ये राज्यातील दोन हजार धावपटुनी सहभाग घेतला होता.या मँरेथॉन स्पर्धेत 10 किलोमीटर  धावण्याची शर्यत 1 तास 10 मिनिटात अमोल गेडेवाड यांनी पूर्ण केली.यांना मान्यवरांच्या हस्ते  पदक व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
अमोल गेडेवाड यांचा कास्ती बु. येथील जि.प.कें.प्रा शाळेत शिक्षक के.एस.गायकवाड यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आर.एम. शेख,व्ही.जी.घोड्के,आर.एच.शेख,एम.एस.कलशेट्टी,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post