सिरीया येथील नरसंहाराचा यवतमाळात निषेध



मक़सूद अली
यवतमाळ(जिल्हा प्रतिनिधी)  सिरीया येथे निष्पाप नागरीकांचा होत असलेल्या नरसंहाराचा निषेध  येथील मुस्लीम बांधवांनी आज 16 मार्च रोजी निषेध रॅली काढून केला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यापुर्वी येथील तिरंगा चौकात मुस्लीम बांधवांची रॅली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत पोहचली. येथे रॅलीचे रुपांतर सभेत होवून यावेळी समाजातील वरिष्ठ नागरीकांनी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले. मागील काही दिवसांपासून सिरीया या देशामध्ये गृहयुद्ध सुरु आहे. तेथील राज्यकर्ता रशिया व इजराइल या देशाच्या मदतीने हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याला विरोध करणारे नागरीकांना सैनिकांमार्फत ठार मारण्यात येत आहे. याचा निषेध यावेळी करण्यात आला. 



या निषेध रॅलीमध्ये तारीक साहीर लोखंडवाला,शब्बीर खान, इमरान देशमुख, मो.आसीमअली, मकसुद अली पटेल, साजिद साहिर, निज़ाम काज़ी,  रियाज़ चौहान,फसिउल्लाह खान, जुनेद,नासिर मोलवी,वसीम खान,जावेद इकबाल,सय्यद मतीन, आदींसह शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post