इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- येतील देवगिरी ग्लोबल अकॅडमी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या स्नेहसंमेलन उदघाटन लोहारा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विवेकानंद जे पाटील होते.तर प्रमुख म्हणुन सतीश इंगळे सर,मोहिते सर,प्रवीण पाटील,नगरसेवक आयुब शेख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर जट्टे,बरीदे सर,कारभारी सर आणि 10 वर्षांची वीरश्री डाके (लावण्याखणी),अदि उपस्थित होते.
यावेळी बाळ कलाकारांनी गायन,सामूहिक नृत्य मराठी व हिंदी चित्रपटातील व देश भक्ती या गीतावर बहारदार नृत्य सादर करुन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये नर्सरी वर्गातील चिमुकल्यानी कार्यक्रमाची सुरुवात केली. आकर्षण वेशभूषा आणि विविध कलाप्रकारांचे उपस्थित रसिकांनी कौतुक केले आणि कार्यक्रमाचा शेवटी 1ली च्या विध्यार्थ्यांनी निऑन नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. हा नृत्य कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली खराडे व ऐश्वर्या माळवदकर व समाधान इंगळे सर यांनी केले.तर आभार सोनाली खराडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
या कार्यक्रमात अकॅडमीतील शिक्षक अमित बोराळे, जयेश पुकाळे,भाग्यश्री सुरवसे,जहेरा बागवान, अनुराधा कोळी,शकुंतला बिराजदार,अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास शिक्षक वर्ग,शिक्षककेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
