युवा क्रांती विकास मंचच्या अध्यक्ष पदी मोहन श्रीवास यांची नियुक्ती



  • असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित ठरली पुढील चळवळीची दिशा

प्रवीण वैष्णव 
तेल्हारा दि : -युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेच्या तेल्हारा शहर अध्यक्ष पदी मोहन श्रीवास यांची नियुक्ती संघटनेचे सस्थापक अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी 29 मार्चला माहेश्वरी भवन येथे संघटनेच्या आयोजित बैठकीत केली संघटनेची बैठक सामाजिक कार्यकर्ते देविदास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली ,सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा थांबलेले प्रश्न मार्गी लागावे अनेक समस्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने पाच वर्षा पूर्वी युवा क्रांती विकास मंच ची स्थापना करण्यात आली संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लागल्या बद्दलचा लेखा जोख संघटनेचे सवस्थापक अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी प्रास्ताविकातून युवकान समोर मांडला . संघटनेचे मार्गदर्शक प्रा.कृष्णा फंदाट यांनी सांगितले की संघटनेने आता व्यापक दृष्टिकोन ठेवून संघटनेचा सर्वत्र विस्तार करावा तसेच गोवर्धन पर्वत उचलतांना ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णा बरोबरच सर्वांचा हातभार लावला त्याच प्रमाणे या संघटनेची पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले कादर भाई यांनी आपल्या शेर शायरीतून एकीचे बळ काय असते या बद्दल विस्तृत माहिती दिली देविदास तायडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संघटनेच्या माध्यमातून  आतापर्यंत सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पडल्या बद्दल संघटनेच्या कार्याचे कौतुक केले या वेळी युवा क्रांती विकास मंच तेल्हारा शहर अध्यक्ष पदी मोहन श्रीवास यांची नियुक्ती करण्या आली उर्वरीत कार्यकारिणी आठ दिवसाच्या आत करण्या येईल  सूत्र संचालन युवा क्रांती विकास मंच चे सरचिटणीस मिलिंद दांडगे यांनी केले या वेळी बैठकीला तालुका अध्यक्ष अनंत माणखैर  संतोष राठी शेख ताजोदीन राजेश काटे  विठ्ठल राऊत बाबूलाल पोहोरकार लखन सोनटक्के शब्बीर शाह शेख हुसेन शेख इस्माईल सुदाकर गावंडे  नितीन ढोके शिवहरी खेट्टे गजानन मोरखडे गणेश काकड मुन्ना मोगरे गोपाल खोपले विशाल सोनटक्के कैलास श्रीवास रवी येवले सचिन थाटे चितोडे गुरुजी  बंट्टी राऊत स्वप्नील सुरे मनीष डांबरे रवी देशमुख संतोष पोहरकार बबलू ठाकूर निलेश निवाने विठ्ठल मामनकार नितीन मानकर शुभम टिकार  आकाश फाटकर अमोल अकोटकर शाम खारोडे  राहुल झापर्डे भैया खारोडे शेख हसन शंकर ढेंगे मुन्ना मानकर नागोराव तायडे राधेश्याम तायडे विठ्ठल भिवटे शुभम बरडे राहुल भिवटे शिवप्रसाद घोडेस्वार अजय सुरे  अजय तायडे शाम अढाऊ  निखिल कापसे राम खाडे केळाभाऊ जायले सुयोग चाहजगुणे राजू यादव  बंट्टी गोदे लखन खंदारे  शिवचरण राऊत मंगेश हागे राजू देशमुख किशोर डांबरे अमर भरसाकळे गणेश घ्यार विठ्ठल ठाकरे विलास सोनटक्के शे अमीन ,शेख नासीर  मंगेश मामनकार अक्षय देशमुख चिराग फाटकर  पवन झापर्डे अमित घोडेस्वार  विक्की घुले अक्षय सुरे गोपी घोडेस्वार इत्यादी युवा क्रांती विकास मंच चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते आभार संतोष राठी यांनी मानले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post