अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसुल येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


मनीष वानखडे.
अकोट तालूक्यात येणार्या वेताळबाबा नजीक
पाटसुल- स्थानिक अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसुल येथे दिनांक 10/03/18 रोजी सावित्रीबाई फुले स्मृती दिनी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागसेन वाकोडे तर प्रमुख उपस्थिती कु.सुवर्णा धर्मे  ह्या  होत्या.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.शाळेचे  मुख्याध्यापक श्री. नागसेन वाकोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सागर कोवळे यांनी तर आभारप्रदर्शन श्री.मंगेश कडू यांनी मानले.
     या कार्यक्रमाला श्री.गिर्हेपुंजे, श्री.ए.व्ही.पजई, कु. राऊत श्री.राठोड ,श्री.बाळापुरे,श्री.मिसार, श्री. इंगळे,  व सर्व विद्यार्थी,  तसेच बीव्हीजी कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post