इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक लाख रुपयाचा उतेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.अवघ्या २ गुणांमुळे राज्यात प्रथम क्रमांक हुकला व राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आले.ग्रामीण रुग्णालयाला ९८ % गुण प्राप्त झाले व राज्यात तिसरा व मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
गतवर्षी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला राज्यात द्वितिय क्रमांक (९६.४) चा दहा लाख रुपयेचा पुरस्कार व प्रमाणपत्र मिळाले होते.मिळालेला पुरस्कार सातत्याने टिकविण्यात स्पर्शने बाजी मारली.हाती घेतलेले आरोग्य सेवेचे कार्य सातत्यपूर्ण करणे ते टिकवणे व त्यात आणखीण सुधारणा करण्याची शिकवण येथील कर्मचार्याच्या अंगी भिनली आहे असे रमाकांत जोशी यांनी हा पुरस्कार स्पर्शला घोषित झाल्यानंतर काढले. काम चांगले तळमळीने व आत्मीयतेने केले तर येणाऱ्या रुग्णांना आत्मिक समाधान मिळते व हेच आज पर्यत स्पर्शला मिळालेल्या यशाचे गमक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला आता पर्यत आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल २ वेळा राज्यात प्रथम क्रमांकाचा डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार,माता बाल संगोपणाच्या विशेष कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुण्यशोल्क आहिल्यादेवी होळकर पुरस्कार, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांकचा कायाकल्प पुरस्कार,राष्ट्रीय गुणवत्ता हमी चाचणी साठी निवड झालेले मराठवाड्यातील केवळ दुसरे ग्रामीण रुग्णालय,लोकसेवा पुरस्कार,मराठवाडा भूमिपुत्र भूषण पुरस्कार पर्यावरण संतुलना साठीचा महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार,व आय.एस.ओ मान्यता प्राप्त इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग उस्मानाबाद,राष्ट्रीय आरोग्य अभियान,उस्मानाबाद,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे यांच्या प्रेरणेने डॉक्टर व कार्मचाऱ्याच्या अथक परिश्रमामुळे स्पर्शला हे येश मिळाल्याचे रमाकांत जोशी यांनी सांगितले आहे.

Congratulation to all "SPARSH" Hospital staff.
Reply