ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून युवा सेने नी घेतली सामान्य ज्ञान परीक्षा



अकोला :- महेश मोरे ;तालुका प्रमुख युवासेना बोरगाव वैराळे ;बाळापुर तालुका युवासेनेच्या वतीने बाळापुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याचा उपक्रम हाती घेतला असून हि सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याची संकल्पना जिल्हा युवासेना प्रमुख  विठ्ठल सरप पाटिल यांची असून त्यामागे उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जीवन जगत असलेला विद्यार्थी हा शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे पडता कामा नये म्हणून या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून खंडाळा येथील ज्ञानगंगा विद्यालयात इयत्ता ४थी ९ पर्यत शिक्षण घेत असलेल्या २०० विद्यार्थ्यानी आज दि २१मार्च २०१८ रोजी सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी झाले होते हि परीक्षा बाळापुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत घेण्यात येणार असल्याचे मनोदय बाळापुर तालुका अध्यक्ष महेश मोरे यांनी यावेळी व्यक्त केले


          युवासेनेच्या वतीने घेण्यात येत असलेली परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शेख सर मुख्याध्यापक, नाईक मॅडम, मेथडे सर, लव्हाळे सर, हेरोळे सर,देशमुख मॅडम, शेळके सर,कारंजकर सर यासाठी विशेष सहकार्य केले तर खंडाळा येथील युवासेनेचे कार्यकर्ते महेश लव्हाळे, मंगेश काठोळे, शरद यादगिरे, देवानंद अंधारे , शुभम अंधारे, गणेश इंगळे, संजय आगरकर, मंगेश कसुरकार, क्रिष्णा ठाकरे, प्रदीप लवाळे, अंकुश लवाळे आदीनी विशेष परिश्रम घेतले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post