उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यात 33 तलाव परिसरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत शासनाच्या सहकार्याने व अनुलोम स्वंय सेवी संस्थेच्या मदतीने लोकसहभागातुन कामे सुरु करण्यात आली आहेत.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यात 33 तलाव परिसरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत शासनाच्या सहकार्याने व अनुलोम स्वंय सेवी संस्थेच्या मदतीने लोकसहभागातुन कामे सुरु करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने प्रशासनाच्या सहकार्याने लोकसहभागातुन जलयुक्त शिवार सारख्या अनेक योजना राबविल्या आहेत.अशा स्वरुपाची गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्हा अधिकारी डॉ.राधाकृष्ण गमे यांच्या नेतृत्वाखाली अनुलोम स्वंय सेवी संस्था यांच्या मदतीने लोहसहभागातुन प्रशासनाकडुन उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे  राबविण्यात येत आहे.जिल्हा अधिकारी डॉ.राधाकृष्ण गमे यांनी अशा विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवीत असल्याने यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार यमगरवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 435 तलावांचे सर्वेक्षण करुन 287 तलावाची या कामासाठी निश्चिती करण्यात आली आहे.दि.5 मार्च पासुन या कामास सुरु करण्यात आली आहे.या कामामुळे सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.या कामाच्या माध्यमातुन आतापर्यंत 48 हजार ब्रास गाळ उचलण्यात आला आहे.यामुळे भविष्यात तलावातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.या कामासाठी प्रशासनाकडुन डिझेल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.या योजनेसाठी शासनाकडुन आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत तलावातील उचलेला गाळ शेती शिवारात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.या कामास गावातील ग्रामस्थ,जिल्हा प्रशासन,अनुलोमचे वस्तीमित्र यांचे सहकार्य लाभत आहे.या योजने अंतर्गत राज्यातील 34 हजार तलावाचे सर्वेक्षण करुन सध्या 5 हजार तलावाचे कामे सुर करण्यात आली आहेत.
या योजनेचा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे अवाहन अनुलोम चे जिल्हा जनसेवक संतोष कोळी यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post