लोहारा तालुक्यातील कंपार्टमेंट बर्डिगच्या कामांचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा तालुक्यातील कंपार्टमेंट बर्डिगच्या कामांचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.  लोहारा तालुक्यातील १४ गावांमधील ११२ कामांसाठी ६ कोटी ६२ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून यामुळे लोहारा तालुक्यातील १२६०० हेक्टर एवढ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातुन उमरगा-लोहारा तालुक्यातील ३४ गावांतील कंपार्टमेंट बर्डिगच्या कामांसाठी १७ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या कामचा शनिवारी सायंकाळी लोहारा व आरणी येथे कंपार्टमेंट बर्डिगच्या कामाचा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकार,नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे,तालुका कृषी अधिकारी ए.ए.मगर,युवा सेना तालुकाप्रमुख दीपक मुळे, तलाठी जगदिश लांडगे, शहरप्रमुख सलीम शेख,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,तलाठी जगदिश लांडगे, नगरसेवक शाम नारायणकर,युवा शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, शिवसेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, व्यंकट घोडके,कालिदास दरेकर,नामदेव लोभे प्रताप लोभे,आदी उपस्थित उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post