शिक्षक सेनेची लोहारा तालुका कार्यकारणी जाहीर: अध्यक्षपदी प्रविण ठाकूर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या लोहारा तालुका कार्यकारणी निवडीची बैठक शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष काशिनाथ भालके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून प्रविण ठाकूर ,सरचिटणीस मुकुंद शेटे,उपाध्यक्ष नाना कोळी व बाबासाहेब मोरे,प्रसिद्धी प्रमुख रघुराज लाडे, कार्याध्यक्ष प्रमोद कानडे,कोषाध्यक्ष परशुराम शेरखाने,संघटक अनंत सुतार व अतुल बाबळे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सहदेव कोळी,जिल्हा कोषाध्यक्ष राजशेखर स्वामी,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश साळुंके, जिल्हा संघटक सुधाकर कांबळे,अदि उपस्थित होते. यावेळी निवडीचे पत्र देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री काशिनाथ भालके सर यांनी संघटनेची कार्यपद्धती आणि दिशा याबाबत माहिती दिली.सी एस पी बँक खाते, जूनी पेंशन योजना,२३/१० चालू अन्यायकारक जीआर याविषयी आवाज उठविला जाईल असे सांगितले.यानंतर सुरेश साळुंके यांनी शिक्षक हीच एकमेव जात समजून त्यांच्या हक्कासाठी लढत राहू असे सांगीतले. नवनियुक्त अध्यक्ष प्रविण ठाकूर यांनी सर्वांना सोबत घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहू असे सांगितले.या कार्यक्रमास पतसंस्थेचे सचीव सुर्यकांत पांढरे,व्यंकट पोतदार,दिपक पोतदार,सुधीर घोडके,मल्लिकार्जुन कलशेट्टी,परमेश्वर सुर्यवंशी, डोकले मामा,युसुफ पटेल,साजिद मुजावर,राहुल ओवांडकर,शिवाजी वाघमारे,पाशा शेख,भिमाशंकर डोकडे,तानाजी पाटील,अशोक पवार यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास घोडके यांनी केले तर आभार मुकुंद शेटे यांनी मांनले.या निवडीबद्दल खा.रविंद्र गायकवाड,आ.ज्ञानराज चौगुले,शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,नगरसेवक शाम नारायणकर,नगरसेवक प्रताप घोडके यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post