लोहारा येथील न्यू व्हिजन स्कुल या शाळेच्या शिक्षक स्टाफने उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयास भेट दिली.



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील न्यू व्हिजन स्कुल या शाळेच्या शिक्षक स्टाफने उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयास भेट दिली.या शाळेस उपक्रमशील शाळा व ज्ञान रचनावाद नुसार अंमलबजावणी करणारी आदर्श शाळा म्हनून पुरस्कार मिळालेला आहे.या भेटीत शाळेत विज्ञान,भाषा,गणित,सामाजिक शास्त्र इत्यादी सर्व विषयाच्या प्रयोगशाळा पाहण्यात आल्या.या प्रयोगशाळेमध्ये विषयाशी संबंधित अनेक गोष्टी विध्यार्थ्यांना समजण्यासाठी व अवघड वाटणाऱ्या काही संकल्पना लुडो,सापशीडी,कोण बनेगा करोडपती,अशा मुलांना आवडणाऱ्या खेळाच्या माध्यमातून अगदी सहज व सोपे करून दाखवण्याचा  खूप छान प्रयत्न करण्यात आला आहे. यात गणितीय सूत्रे,आकार,वस्तुमान,भाषेचे व्याकरण, काळ,विज्ञानमधून नवीन शोध,मानव व प्राणी यांच्या जीवनात विज्ञानाचे महत्व,सा.शास्त्रातून गृह,तारे,सूर्य चंद्र ग्रहण,जग,खंड,देश,राज्य,रब्बी व खरीप पिके, ऋतू,भारतीय संस्कृती- परंपरा असे एक अद्भुत विश्व शाळेतील प्रयोग शाळेतून पाहण्यास मिळाला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी.के.घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक अजय गायकवाड, शिवानंद बुधले,एस.एल.कदम,सत्यवान भालेराव, शिवाजी लोखंडे,एल.आर.पाटील,महेश दुधनकर, बालाजी घुले,भगवान तेलंग,मिस. पार्वती देसाई, श्रीकृष्ण रंगदळ,रविराज पाटील,या सर्वानी त्यांच्या अथक परिश्रमातून शाळेला एक वेगळ्या उंचीवर पोहचविले आहे.या भेटीच्यावेळी न्यू व्हिजन स्कुलचे सचिव तथा प्राचार्य शहाजी जाधव,संचालिका सौ. सविता जाधव,शिक्षक वर्गातून सिद्धेश्वर सुरवसे, हरवून हेड्डे,सुदर्शन भरती,मिस बबिता शिंदे,मिस प्रियांका वचनेपाटील,मिस मुमताज सवार,मिस. अनुराधा बंडगर,मिस पूजा दाळिंबकर,मिस ललिता रोडगे,मिस सोनाली राठोड,मिस प्रणिता घोडके,मिस वर्षा सुरवसे,मिस चांदबी चाऊस आदी उपस्थित होते. अशा या शाळा भेटीतून स्कुलमधील शिक्षक व शिक्षिका यांच्यामध्ये नक्कीच एक सकारात्मक बदल घडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांच्याकडून आणखी जास्त प्रयत्न अशा या नवनवीन उपक्रमातून प्रयत्न होईल अशी आशा व्यक्त केली. शेवटी स्कुलच्या सर्व टीमचे कौतुक या अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post