लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये पीपल्स



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये पीपल्स ऑलम्पियाड असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे विविध स्तरावरील सिकई मार्शल आर्ट व कराटेमधील येलो,व्हाईट,ऑरेंज,ग्रीन अशा बेल्टसाठी परीक्षा व प्रात्यक्षिक घेण्यात आले.याप्रसंगी औसा तालुक्यातील किल्लारी मधील महाराष्ट्र विद्यालय व  लोहारा येथील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल व लोहारा येथील जिजाऊ मेमोरियल इंग्लिश स्कुलचे विध्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये कु.स्वेता शिवराज झिंगाडे हिने व प्रतीक गणेश सूर्यवंशी याने यलो बेल्ट,कु. संस्कृती शहाजी जाधव,कु.सृष्टी हेमंत श्रीगिरे,कु. प्राजक्ता शिवदास भिसे,कु.संजीवनी रामहरी सूर्यवंशी, अमन खयूम शेख,महेबूब बिस्मिल्ला मोमीन,रुषांक धोंडिबा ओवंडे,शाहिद इरफान शेख,कु.संस्कृती गोविंद कोकाटे,कु.गायत्री भोसले यांनी ऑरेंज बेल्टसाठी तसेच अजिंक्य बिराजदार,आदित्य बजाज, कु.नंदिनी बजाज यांनी ग्रीन बेल्टसाठी परीक्षेत ए ग्रेडमध्ये यश समपदन केले.यावेळी परीक्षक म्हणून असोसिएशनचे सचिव महम्मदरफी शेख व राहुल अम्बुरे यांनी काम पाहिले.या परिक्षा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.यावेळी यशस्वी
विद्यार्थ्याना स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते यलो,ऑरेंज व ग्रीन बेल्ट देवुन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शहाजी जाधव,सिद्धेश्वर सुरवसे,हारुन हेड्डे,मिस. सविता जाधव,अदिंनी परिश्रम घेतले.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास भोसले,स्कुल व्यवस्थापन समिती सदस्य डॉ.हेमंत श्रीगिरे,इरफान शेख,संभाजी पोतदार,अदिंनी अभिनंदन  केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post