मातेनी नऊ महिने पोटात ठेवलय,
अन् प्रियकर/प्रियसी साठी क्षणात मरण्याची तयारी चाललीय् ...
A B C D ने इतके वेड लावलय की,
आज वय होऊनही अ आ इ ई पाठ करण्याची फक्त तयारीच चाललीय् ...
विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची,
आमच्या राजनेत्यांची अद्यापही तयारीच चाललीय् ...
म्हणतात की कापूस-संत्र्याचे विदर्भात जगाच्या पातळीवर
सर्वाधिक सर्वोत्तम उत्पादन होते,
तरी सुद्धा इथल्या शेतकऱ्याची आत्महत्येची तयारी चाललीय् ...
इथे तर मरणही आपल्या हातात नाही मित्रांनो,
पण मजा बघा,
भ्रष्टाचाराने स्वर्गप्राप्तीची तयारी चाललीय् ...
अनिकेत व.प्र. देशमुख
