बालरक्षक श्री.आश्राजी कावळे यांनी मिळवून दिला ५ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश



चेतन पवार
उमरगा- तालुका (प्रतिनिधी):-  जि.प.प्रा.शा. तांदूळवाडी ता. वाशी  चे   मुख्याध्यापक श्री आश्राजी कावळे यांनी फक्राबाद परिसरामधे उसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या शाळाबाह्य़  मुलांना  शिक्षणहक्क कायद्यानुसार  फक्राबाद जि.प.शाळेत तात्पूरता प्रवेश मिळवून दिला.वाशी तालूका परिसरामधे कुठेतरी ऊसतोडणीला आलेल्या कामगारांची मुले शाळाबाह्य आहेत अशी माहिती त्यांना कार्यालय  मार्फत  मिळताच श्री कावळे यांनी तात्काळ याची दखल घेत अनेक ऊसवाहतूक करणार्‍या वाहनांच्या चालकांची व ऊसतोडणी मुकादमांची भेट घेतली,ऊसतोडणी कोणाकडे चालू आहे याचा शोध घेतला तेव्हा ही मुले फक्राबाद परिसरात असल्याची माहीती मिळाली व श्री कावळे यांच्या प्रयत्नाने २शाळाबाह्य विद्यार्थी तेथील शाळेत प्रवेशीत झाले.श्री.आश्राजी कावळे यांनी प्रयत्नपूर्वक यापूर्वीही ३ शाळाबाह्य विद्यार्थीनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले व गावातील शाळेत  प्रवेशही  दिला.त्याबद्दल वाशीचे ग.शि.अ.श्री.भट्टी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
   कावळे यांनी यापूर्वीही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून सतत प्रयत्न केले आहेत.तांदूळवाडी कारखाना परिसरात असलेले विद्यार्थी शाळाबाह्य राहू नयेत म्हणून ते  वारंवार चौकशी करतात.विद्यार्थ्यांना नियमित आपल्या स्वतःच्या गाडीमधे शाळेला ने आण करतात.त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली असून ते विद्यार्थी नियमित शाळेत हजर राहतात.शिक्षणहक्क कायदा नुसार सर्व ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थी  शाळेत शिकले पाहीजेत.त्यासाठी शासनस्तरावरून मोठी राज्यव्यापी योजना कार्यन्वीत आहे.तरीही मोठ्या शहरामधे ,फिरत्या वस्तीवर असे शाळाबाह्य विद्यार्थी आढळून येताना दिसतात .यासाठी अशा तळमळीच्या  शिक्षकांची गरज आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post