चेतन पवार
उमरगा (तालुका) प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्रशाला आलूर येथे 23 मार्च रोजी भगतसिंग , सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती हाच दिवस आज शाहिद दिन म्हणून प्रशाला आलूर येथे साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापक मुळजे अण्णाप्पा हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बसव प्रतिष्ठाण चे राष्ट्रीय अध्यक्ष रामलिंग पुराणे तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यकष मोहन जाधव, शिक्षण प्रेमी चंद्रकांत शंके ,शिबिरे लक्ष्मण सर ,गायकवाड डिगंबर सर, सुनिल राठोड सर, चेतन पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. रामलिंग पुराणे यांनी क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा का झाली याबद्दल माहिती सांगितली तसेच किरण गायकवाड यांनी भगतसिंगांच्या विचाराचे आचरण करून त्यागाची भावना व राष्ट्रभक्ती कशी निर्माण करावी याबद्दल तर मोहन जाधव यांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचनाची आवड कशी निर्माण करावी याबद्दल माहिती सांगितली
10 वीच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी क्रांतिकारकांचे फोटो व शाळेसाठी एक मोठी घड्याळ आठवण म्हणून दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सुनिल राठोड सर, स्वामी शिवराज सर, महेश कांबळे सर , डिगंबर गायकवाड सर ,हरिभाऊ माकणे सर, प्रवीण नलवाड सर,दिलीप राठोड सर,रघुराम वायकर सर ,चनाप्पा ब्याळीकुळे सर, आदींनी पुढाकार घेतला
सूत्रसंचालन विद्यार्थी अनिल पांढरे तर आभार सद्दाम बंदुवाले यांनी मानले
