मुर्तिजापुर :सामाजिक हिताच्या दृष्टीने विधायक कार्य करण्यात अग्रेसर असलेल्या मैलाना आझाद विचार मंच जिल्हा शाखा अकोला च्या पूर्ण गठण नुकतेच करण्यात आले असून जिल्ह्य़ातील युवा नेतृत्वाला वाव देण्यात आला आहे.
- जिल्हा उपाध्यक्ष पदी मो.रिजवान सिद्दीकी यांची निवड.
या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मो.रिजवान सिद्दीकी यांची तर तालुका अध्यक्ष पदी मो.शहाबोद्दीन शहर अध्यक्ष पदी अ.खालीद अ.मन्नान यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र हुसेन दलवाई (राष्ट्रीय अध्यक्ष मैलाना आझाद विचार मंच ) यांनी अकोला येथील एका कार्यक्रमात दिले आहे. या नियुक्ती मुळे स्थानिक कार्यक्रम मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय अध्यक्षनी आमच्या वर दाखविलेल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जावू देणार नाही विचार मंच चा विस्तार व विधायक कार्य मध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्य़ात अग्रेसर राहू असे मो.रिजवान सिद्दीकी यांनी नियुक्ती नंतर आपले विचार व्यक्त केले. विभागीय अध्यक्ष नाझीर पटेल, अमन निर्बंध (यवतमाल) जिल्हा अध्यक्ष मुजम्मिल अली खान थाना (मुम्बई ) जिल्हा प्रमुख सोनोने यांनी केलेल्या सहकार्य बदल तिन्ही युवा नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहे .
