मक़सूद अली
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील ब्रिटीश कालीन श्री हनुमान मंदिर हनुमान आखाडा चौक यवतमाळच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि. 27 मार्च रोजी सायंकाळी 6.30 ते 10 वाजता पर्यंत संगितमय सुंदरकांड व भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन 28 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता किर्तन महोत्सवाचे उद्घाटन, उद्घाटक बोपापुर वासी पुज्य महंत अंबिका भारती माता यांचे शुभहस्ते जेष्ठ साहित्यिक डॉ. शरद कळणावत यांच्या विशेष उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. कांचन चौधरी, माजी नगराध्यक्ष न. प. उपाध्यक्ष सुभाषभाऊ राय, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, दि. यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड चे अध्यक्ष अजय मुंधडा, गोदावरी मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थेचे अरूण भिसे, उद्योजक अन्वर लोढा यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 28, ते 30 मार्च पर्यंत हभप सौ. मानसी श्रेयस बडवे, पुणे यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम, 31 मार्च रोजी सकाळी 6 ते 8 जन्मोत्सव, आरती, हनुमान चालिसा, रामरक्षा पठण, सकाळी 9 वाजता 111 किलो लाडुंचा महाभोग, 9 ते 12 संगितमय सुंदरकांड, शुक्ला महाराज व्दारा प्रस्तुत 12 ते 3 महाप्रसाद व संगीतमय भजन तर सायंकाळी 6.30 ते 10 पर्यंत गायिका कुमारी निकीता श्रिवास यवतमाळ, यांचे श्रृती मधुर स्वर पर्व व रात्री 10 वाजता समापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर समिती हनुमान आखाडा चौक यवतमाळचे अध्यक्ष ईश्वरलाल राय, उपाध्यक्ष वासुदेव राव बावीस्कर, सचिव गोविंदराव यादव, कोषाध्यक्ष नंदकुमार बदनोरे यांनी केले आहे.
