लोहारा येथील भारतमाता मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघमार्फत लोहारा शहराचा वर्षप्रतिपदा उत्सव संपन्न



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील भारतमाता मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघमार्फत लोहारा शहराचा वर्षप्रतिपदा उत्सव संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  म्हणूण लोहारा तालुका बौद्धिक प्रमुख तथा प्रा. यशवंत चंदनशिवे , तर प्रमुख अतिथी म्हणून लोहारा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद भाऊ गिरी,लोहारा तालुकयाचे मा. संघचालक अशोकराव पाटील,उस्मानाबाद जिल्हा बौद्धिक प्रमुख शहाजी जाधव,जनकल्यानचे पूर्ण वेळ कार्यकर्ता शंकर जाधव,नगरसेवक श्रीनिवास माळी,अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम भारतमातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर आद्यसरसंघचालक प्रणाम देन्यात आले.आपल्या मार्गदर्शनात प्रा.चंदनशिवे सर म्हणाले की गुढीपाढवा व वर्षप्रतिपदा म्हणजे हिंदूंचे नवीन वर्षाची सुरुवात आणि प्रभू रामचंद्रांनी  14 वर्ष वनवास भोगून परत अयोध्येत प्रवेश केलेला सुवर्णदिन,तसेच रा.स्व.संघाचे संस्थापक ,आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस असा हिंदूंसाठी दुग्धशर्करा योग्य असलेला दिवस.यामुळे सर्व हिंदूंनी अतिशय आनंदाने व उत्साहाने हा उत्सव साजरा करून आपली भारतीय संस्कृती अशीच पुढेही चालू ठेवावी व आपल्या मनातील जुन्या,वाईट विचारांची जळमटे काढून टाकून नवीन व चांगल्या विचारांची सांगड घालून समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा.यानंतर दयानंद गिरी यांनी सर्वांना वर्षप्रतिपदेच्या आणि श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या व समाजात अशा कार्यक्रमाची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले.यानंतर सर्व उपस्थित स्वयंसेकाकडून भारतमाता मंदिराशेजारी राहणाऱ्या गारुडी,मसणजोगी,कैकाडी लोकांच्या वस्तीवर जाऊन तेथील सर्व लहान मुलांना साखरेच्या हाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यवाह दत्ता पोतदार, सहकार्यवाह श्री दत्तात्रय दंडगुले,जगदीश लांडगे,गणेश हिप्परगेकर, विरेश स्वामी,राजेंद्र सुर्यवंशी,मदन कुलकर्णी,श्रीशैल जटे,कल्याण ढगे,राजेंद्र फावडे,मनोज तिगडे,नागेश पांचाळ,श्रीयश परीट,बालाजी माशाळकर,प्रभात कुलकर्णी,प्रमोद पोतदार,यांच्यासह अनेक स्वयंसेवक  उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहाजी जाधव यांनी केले.तर आभार अशोक शिंदे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post