राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाद्वारा प्रात्यक्षिकातुन प्रशिक्षण



मुर्तिजापूर :- आपत्तीमध्ये सापडल्यानंतर स्वतःच्या जीवाचे रक्षण करून इतरांचे जीव वाचविण्यासाठी समयसूचकता ठेवत आपत्तीच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून स्वतःसह इतरांची सुटका कशा प्रकारे  करावी किंवा आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना, प्राण्यांना वाचविण्यासाठी किंवा सुरक्षितपणे इतरत्र हलविण्यासाठी कय केेेले पाहिजे  हयाबाबतचे आपत्ती प्रशिक्षण येथील तहसील गोडावून मध्ये पुणे येथून आलेल्या राष्ट्री्य  आपत्ती प्रतिसाद दलाद्वारा  (एन. डि. आर. एफ.) देण्यात आले. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे तीन अधिकारी व 19 जवान अकोला जिल्हातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे प्रात्यक्षिकातुन प्रशिक्षण देत आहेत


 यामध्ये टिम कमांडर जे. मुरमू, हवलदार बि.एम. नवले, हवलदार बि. मोटे, हवलदार मनिषकुमार व 19 जवानांचा समावेश आहे. मुर्तिजापूर येथील तहसील गोडाJवून मध्ये आमदार हरिश पिंपळे, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे, तहसीलदार राहूल तायडे, नायब तहसीलदार फरतडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च दर्जदार प्रात्याक्षिक प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणा दरम्यान नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये पुर, भुकंप तसेच आग लागणे, रस्ते अपघातात जखमी झालेले, ह्रदयघात, साप चावणे अशा प्रकारच्या आपत्तीत करावयाची मदत याबाबत सदर टिमने प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी , षिक्षक, आपातकालीन पथकाचे सदस्य, अंगणवाडी सेवीका, तहसील कार्यालयातील कर्मचारी, यांचा समावेश होता.



(नैसर्गिक अथवा इतर कोणतीही आपत्ती  आल्यास  आपत्तीमध्ये अडकलेल्यांना मदत करतांना आजुबाजुच्या परिस्थीतीचे भान ठेवन विचलीत न होता. षांत मनाने परंतु तत्परता दाखवत जेवढा वेळ मिळेल त्याचा उपयोग करून आलेल्या संकंटातून सुटका करण्यासाठी प्रषिक्षण सोबतच प्राथमिक माहिती आवष्यक असते.यातुनच इतरांचे प्राण वाचू शकतात. ---- जे. मुरमू  टिम कमांडर एन डि आर एफ)

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post