वडगाव गांजा येथील केबल दिड महिन्यापासून बंद


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथील डी एन कंपनीचे केबल गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. केबल चालवंणाऱ्या व्यक्तींना विचारले असता चालू होईल असेच निराशा जनक उत्तर येत आहे.सेवा सुरळीत होण्यासाठी केबल ग्राहक अनेक वेळा केबल केंद्र जेवळी येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असून शेवटी निराशाच पदरी पडत आहे.वडगाव गांजा येथे केबल येऊन 3 वर्ष झाले तेंव्हापासून केबलची सेवा कधीच सुरळीत झाली नाही,अधून मधून नेहमी बंदच असते.महिलांच्या मालिका, पुरुषांच्या बातम्या,मुलांचे क्रीडा चॅनल आणि बच्चे कंपनीचे छोटा भीम आता वडगावकराना बघता येणार नाही.सध्या पोलीस भरती चालू असून भरतीमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकाला चालू घडामोडीही पाहता येणे शक्य नाही.यावर प्रशासनाची नजर आहे की नाही किंवा या कंपनीवर देखरेख करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आहे की नाही, या केबलचे प्रेक्षेपण कसे होते,सेवा सुरळीत आहे किंवा नाही,असे प्रश्न ग्रामस्थामधून उपस्थित होत आहेत.यावर प्रशासनाने करडी नजर ठेवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी नागरीकातून होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post