उमरगा, जिल्हा. उस्मानाबाद गावाची लोकसंख्या 9000ते 10000 ग्रामपंचायत सदस्य संख्या 15 आ हे

उमरगा- तालुका प्रतिनिधी चेतन पवार
आलुर ग्रामपंचायत, ता. उमरगा, जिल्हा. उस्मानाबाद गावाची लोकसंख्या 9000ते 10000 ग्रामपंचायत सदस्य संख्या 15 आ हे. मतदार 5000 आसपास आहे.सदर ग्रामपंचायतमध्ये 15सदस्य  एकाच वेळेस आलेतर बसायला सुध्दा व्यवस्थित जागा पुरेशी नाही.
ग्रामसभा चालु असताना तर सामान्य नागरिकांना बसायला जागा नसते. व्हरांड्यात व जिन्यामध्ये उभे राहावे लागते. नागरिकांना जागेअभावी ग्रामसभेत भाग घेता येत नाही.
आलुर ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी माननीय.लोकसभा-विधानसभा सदस्य यांच्या निधीतून मिळू शकते का. कमीत कमी गावाच्या निवडून आलेल्या सदस्यांना तरी मोकळा श्वास घेऊन जनतेचे प्रश्न निकाली लावता येईल सदर गावात सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बनेल.
गावामध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. त्याकारणाने खेळाडूंचा विकास होत नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार असे खेळाचे साहित्य उपलब्ध. शिक्षणाचा स्तर तर अत्यंत वाईट आहे. इतका की एखाद्या दहावीच्या विद्यार्थ्यांला आपले स्वत:चे नाव ही इंग्रजीत लिहिता येत नाही. त्यासाठी अभ्यासिका सुरू करता येऊ शकते. कोणतीही मोठी बॅंक गावात नसल्याने व्यावसायिकांची मोठी अडचण होत असते. आठवडे बाजारासाठी स्वतंत्र जागा असावी. जेणेकरून व्यवसाय वाढ होईल. बाजारपेठ निर्माण होईल. पर्यायाने ग्रामपंचायतीला महसुल मिळेल. गावामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बौध्द वस्तीत तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो पाणी भरताना. आबालवृद्धांना तर येथे जीव मुठीत धरून पाणी भरावे लागते.
वृद्धांसाठी एखादे विरंगुळा केंद्र असावे. गावातील तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण खुप आहे. मद्य अगदी सहज उपलब्ध आहे. त्यामुळे मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण खुप आहे.
*नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी* या सर्व प्रश्नांचा छडा लावावा अन् आलुर गावाला विकासाच्या वाटेवर न्यावे.
*गुडविल फाऊंडेशन*
*अविनाश कांबळे*

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post