तु निवारा सोडलास,
संवेदना बोथट झाल्या..
रोषणाई चेहऱ्यावर
मात्र भावना मृत झाल्या....
मन बंबाळ रक्ताने,
शब्दांच्या सुऱ्या झाल्या....
वाट दिसे नयनी,
पण वाटा अद्रुष्य झाल्या....
जगणे व्यर्थ माझे,
यातना अनावर झाल्या....
रोषणाई चेहऱ्यावर
मात्र भावना मृत झाल्या....
अनिकेत व.प्र. देशमुख

