शहरात कचरा जमा होऊन आरोग्यास बाधा होऊ नये यासाठी नगरपंचायत च्या वतीने शाश्वत



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शहरात कचरा जमा होऊन आरोग्यास बाधा होऊ नये यासाठी नगरपंचायत च्या वतीने शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी लोहारा शहरातील नाहरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.लोहारा नगरपंचायतच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दि.25 मार्च रोजी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे (घंटा) गाडीचे उदघाटन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, राष्ट्रवादीचे उमरगा लोहारा विधान सभा अध्यक्ष राहुल पाटील, रॉष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष किशोर साठे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,बाजार समिती उपसभापती प्रा.आनंदराव सुर्यवंशी, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पो.नि.सर्जेराव भंडारे, नगराध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे,उपनगराध्यक्ष नाजमिन शेख,नगरसेवक आबुलवफा कादरी, मुख्याधिकारी सोनम देशमुख,शिवाजी अप्पा कदम, अदि उपस्थित होते.याच कार्यक्रमात मेस्सा कायदा रद्द करण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवून कायदा स्थगित करायला भाग पडल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांचाअंगणवाडी कार्यकर्ती संघटनेच्या वतीने वंदना भगत यांच्यासह कार्यकर्तींनी सत्कार केला.
                  यावेळी राहुल पाटील, नगराध्यक्षा पोर्णिमा लांडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी सोनम देशमुख व सुत्रसंचालन दिपक चाबुकवार यांनी केले. तर आभार शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेविका ज्योती मुळे, नगरसेविका सुनिता ढगे,नगरसेविका आरती गिरी,नगरसेविका निर्मला स्वामी,राष्ट्रवादी गटनेते तथा नगरसेवक गगन माळवदकर,शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक प्रताप घोडके,नगरसेवक शाम नारायणकर,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,कॉग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक आरीफ खाणापुरे,नगरसेवक श्रीनिवास माळी,बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी,जनार्धन सेवा संस्था लातुरचे सचिन कुलकर्णी,शिवसेना युवा तालुका प्रमुख दिपक मुळे,युवा शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,सुधीर घोडके,आयुब शेख,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post