प्रत्यक्ष आयुष्यात मोठी माणसं येणं ही दुर्मिळ गोष्ट असते. मुळात आरपार पारदर्शी मोठी माणसं कुठं जास्त आहेत? तीच दुर्मिळ आहेत. तेजगड शिबिरात काही खरी मोठी माणसं भेटतील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी आणि नोबेल रसायनशास्त्र परितोषिकाच्या निवड समितीत कार्यरत असणाऱ्या डॉ. सुरेखा देवी ही दोन मोठी माणसं या शिबिरात तीनही दिवस आपल्या सोबत असतील. सोबतच गुजरात आणि महाराष्ट्रातली बरीच लेखक-कलावंत मंडळी या शिबिरात सहभागी होतील. भरपूर ओळखी आणि भरपूर गप्पा होतील.
एक सांस्कृतिक व वैचारिक आनंदयात्रा अक्षर मानव तेजगड सहल व शिबीर तेजगड. गुजरातमधला दूरच्या डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर. आदिवासी इलाखा. इथं माणसाच्या पूर्वजांनी काढलेली बारा हजार वर्षांपूर्वीची गुंफाचित्रं आहेत. लाखो वर्षांपूर्वीच्या डायनॉसॉरच्या खुणा आहेत.
अशा परिसरात भर जंगलात एक आश्रम आहे. जगभरच्या भाषा आणि जगभरच्या आदिवासींच्या जीवनपद्धती, भाषा आणि कलांचं जतन व अभ्यास करणारं केंद्र म्हणजे हा आश्रम. अतिशय रम्य आणि देखणा आहे आश्रम.
तो बांधलाय जागतिक कीर्तीचे भाषातज्ञ व समाजशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांनी. अतिशय शिस्तबद्धपणे पण मनमोकळेपणानंसुद्धा गेली अनेक वर्षं तिथं भाषा, कला, समाज यांचं काम चालतं. डॉ. गणेश देवी आता तिथं राहत नाहीत. व्यवस्थापकांच्या हाती आश्रम सोपवून डॉ. देवी भाषा आणि समाजाचं काम करत जगभर फिरत असतात.
अक्षर मानवकडून महाराष्ट्र व राज्याबाहेरच्याही लोकांसाठी तेजगडची सहल व तीन दिवसांचं शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यात गुजरातच्या लेखक-कलावंतांच्या भेटी, लोककला, लोकवाद्यांची माहिती, भाषांची जाणकारी, चित्रगुंफा दर्शन, एकमेकांच्या ओळखी व गप्पा असा कार्यक्रम आहे. महत्वाचं म्हणजे डॉ. गणेश देवी स्वतः पूर्ण तीन दिवस शिबिरात राहणार आहेत व संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत हे शिबीर वैचारिक व कलात्मक आनंदयात्रा ठरेल. त्यांनी किती मोठं आणि जागतिक पातळीचं काम भाषा व आदिवासी अकादमीच्या रूपानं तेजगडला उभं केलंय ते त्यांच्यासह अनुभवता येईल.तेजगडला येणाऱ्या सर्वांची राहण्या-खाण्याची संपूर्ण व्यवस्था उत्तम व मोफत केली आहे.
- आम्ही रेल्वेनं व बसेस करून तेजगडला जाण्याचं नियोजन करतो आहोत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून माणसं या सहलीत सहभागी होणार आहेत. आपणही या. प्रवेशासाठी काहीच अटी नाहीत. समूहानं एकत्र जमून निघालात तर प्रवासखर्चही माफक होईल. सहलीच्या तारखा आहेत : १, २, ३ जून २०१८. सहभागी होऊ इच्छिणारांनी दिनांक १५ एप्रिल २०१८ पर्यंत नावनोंदणी करावी. सहभागासाठी वय, शिक्षण अशी कोणतीही अट नाही.
- नावनोंदणीसाठी आपल्या भागातल्या खालील पदाधिकाऱ्यांशी जरूर संपर्क करावा :
मुंबई - लालसिंग वैराट ९००४६४२१३२
उत्तर कोकण - विजय जोगमार्गे ९४२१३९२२८९
दक्षिण कोकण - विद्यालंकार घारपुरे ९४२०८५०३६०
दक्षिण महाराष्ट्र - सुनिल कांबळे ९४०३८४९०६०
मध्य महाराष्ट्र - शिरीष भोर ९८२२४९७७११
उत्तर महाराष्ट्र - अभय सोनवणे ७२१९३७०६५२
गोवा - अमोघ चेंडके ९७६३४४८५६२
उत्तर मराठवाडा - दगडू लोमटे ९८२३००९५१२
दक्षिण मराठवाडा - दिलीप अरळीकर ९४२२४६८४१३
पश्चिम विदर्भ - प्रशांत देशमुख ७५५८२५८३८३
पूर्व विदर्भ - कुंजीराम गोंधळे ९४०४०१४८१५
