युवा सेना अकोल्यात घेणार नीट, सीईटी सराव परीक्षा




  • विद्यार्थ्यांनी १२ एप्रिल पूर्वी ऑन लाईन नोंदणी करा, ही परीक्षा नि:शुल्क असणार

  • युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन


अकोला/प्रतिनिधी : युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या  ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यासाठी युवासेना पुरस्कृत MOK TEST 2018 मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवीसाठी शासनाने महाराष्ट्र कॉमन इंटरस टेस्ट ( mht-cet ) अनिवार्य केली आहे. सी.ई.टी, नीट परीक्षा २०१८ च्या पाश्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आर.एल.टी सायंस कॉलेज, सिव्हील लाईन, अकोला येथे होणार आहे. या सराव परीक्षेत सहभागी होण्यासाठी विध्यार्थ्यानी १२ एप्रिलपूर्वी www.ys-cet.com या संकेत स्थळावर नोंदणी करावी असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी NEET-UG, MHT-CET ENG, MHT-CET LAW, MHT-CET CET PET या कॉमन इंटरस टेस्टच्या सराव परीक्षेत सहभागी होऊ शकतात. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी ह्या संधीचा लाभ घेऊन आपल्या उज्वल भविष्यासाठी नाव नोंदणी करावे आणि काही अडचण आल्यास युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post