इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये दि 23 मार्च रोजी निसर्ग संवर्धनासाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.यावेळी प्रमुख म्हणुन सर्पमित्र तथा नगरसेवक श्रीनिवास माळी,जनकल्याण व भारतमाता मंदिर प्रकल्प लोहारा तालुकाप्रमुख शंकर जाधव,लोहारा येथील निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य विरेश स्वामी,सहदेव काडगावे,ओम कोरे,पत्रकार बालाजी बिराजदार,व्यंगचित्रकार गणेश हिप्परगेरकर,स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव आदी, उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षी व प्राण्यासाठी एक छोटेसे पाण्याचा पाणवठा तयार करण्यात आला.जेणे करून त्या पानवठ्यावर पशु-पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होईल.यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी बोलताना म्हणाले कि,दि. 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस व दि.21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस, 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस,दि.23 मार्च जागतिक हवामान दिवस आणि दि.26 मार्च हा जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.हे सर्व दिवस आपण एका उत्सवाप्रमाणे साजरे करून त्यामागचे उद्देश लक्षात घेतले पाहिजे.आणि झाडांची कत्तल थांबवणे,पाण्याचा काटकसरीने वापर करणे,निसर्गाचा समतोल राखणे,चिमण्यासाठी टाकाऊ भरण्यापासून घरटे,बनवून त्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत. यानंतर शंकरजी यांनी निसर्ग संवर्धन विषयाशी संबंधित गीत सांगून विध्यार्थ्यांमध्ये निसर्गाशी मैत्री होण्यासाठी,निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले.त्यानंतर गणेश हिप्परगेकर यांनी चिमण्यांची घरटे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.व हे घरटे मिस वर्षा सुरवसे यांना जन्मदिवसाची भेट म्हणून देण्यात आले.तसेच आपल्या व्यंगचित्राद्वारे वृक्ष आपले मित्र असून त्यांच्यामूळे आपणास पाऊस-पाणी,सावली,फळे, फुले,अन्न इत्यादी सर्व जीवनावश्यक बाबी मिळतात असे खूप मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस सविता जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धेश्वर सुरवसे सर यांनी केले.या कार्यक्रमास स्कुलमधील सर्व शिक्षकवर्ग व पालक मोठिया संख्येने उपस्थित होते.
