प्रवीण वैष्णव
तेल्हारा प्रतिनिधी-:-दि. 26-03 रोजी नाफेड केंद्रामार्फत तेल्हारा येथे शेतकरयांचे हरभरा खरेदी करण्याकरिता नाफेड चा मार्फत खरेदीचा मुहूर्त करण्यात आले होते शेतकऱयांचा 50 किलो हरभरा मोजून पुन्हा शेतकऱ्यांना तो हरभरा वापस देऊन नाफेड केंद्राने खरेदी बंद केली नाफेड ची खरेदि त्वरित सुरू करा या करिता तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
काही दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांना म्यासेज द्वारे माहिती देण्यात आली की नाफेड द्वारे हरभरा खरेदी 26-03 रोजी तेल्हारा यार्ड मध्ये नाफेड चा वतीने हरभरा खरेदी करण्यात येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनि आपला हरभरा 26-03 रोजी मार्केट यार्ड तेल्हारा येथे घेऊन यावे यावेळी काही शेतकरी आपला माल तेल्हारा येथे मार्केट यार्ड मध्ये घेऊन आले आलेल्या म्यासेज नुसार नाफेड केंद्राने शेतकऱ्यांनाचे 50 किलो हरभऱ्याचे खरेदी करुन मुहूर्त करून घेतले व काही वेळानंतर त्या शेतकऱ्यांचे 50 किलो धान्य त्याला वापस देऊन सध्या खरेदी बंद झाल्याचे नाफेड चा वतीने सांगण्यात आले अशाप्रकारे नाफेड केंद्र तेल्हारा चा वतीने शेतकऱ्यांनची थट्टा करण्यात आली या मधील काही शेतकऱ्यानि शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजयभाऊ मोहोड यांना पुर्ण आपभीती सांगितली तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी क्षणाचा विलंब न करता मार्केट यार्ड मध्ये जाऊन नाफेड केंद्राचा हरभरा खरेदी ची पुर्ण माहिती वारीष्ठ अधिकारी कडून घेतली असता यामध्ये चांगलेच राजकारण असल्याचें विजूभाऊ मोहोड यांचा लक्षात येताच यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांच्या पूर्ण विषय लक्षात आणून की काही राजकीय लोकांमुळे शेतकऱ्यांनाचा माल नाफेड केंद्रामध्ये घेणे सुरू होताच बंद करावे लागले अशाप्रकारे शेतकऱ्यांनाची थट्टा करण्यात आली हे शिवसेना कदापी सहन करणार नाही तहसीलदार येवलीकर साहेबांना शेतकऱ्यांनाचे शेतमाल हरभरा लवकरात लवकर खरेदी करुन घेण्याकरिता निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्ध प्रमुख प्रावीण वैष्णव उप ता.प्र. संजय आढाउ उपश प्र निलेश मुरेकर विवेक खारोडे शेतकरी सतीश ढोले अभी रोठे विठ्ठलराव कडू संदीप कराळे व तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .
