माणुसकी


बाबांकडून शिस्त घ्यावी
आईकडून माया.
भावाकडून प्रेम घ्यावे
बहीणीची छाया!!

आजोबांची व्हावे काठी
चष्मा व्हावे आजीसाठी.
जपाव सगळ्याशी नातं
होऊन समईची वात.

फुलपाखरांचे रंग घ्यावे
फुलाफुलातून गंध घ्यावा.
नाचणार्या मोराकडून
नाचण्याचा छंद घ्यावा!!

कोकीळेचा घ्यावा गळा
प्राण्यांचा घ्यावा लळा.
सर्वांसाठी फुलणार्या
फुलांचा व्हावा मळा!!

आकाशात उडण्याआधी
जमिनीवर टिक.
सगळ्यांकडून घेउन काही
माणूसकी शिक!!
माणूसकी शीक!!

किरण बागल.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post