लोहारा तालुक्यातील अचलेर येथील ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन यांच्या यात्रेस गुढी पाडव्याच्या शुभुहर्तावर प्रतिवर्षा प्रमाणे दि.17 मार्च पासुन सुरुवात होत आहे



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील अचलेर येथील ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन यांच्या यात्रेस गुढी पाडव्याच्या शुभुहर्तावर प्रतिवर्षा प्रमाणे दि.17 मार्च पासुन सुरुवात होत आहे.या पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अचलेर पासुन 1 कि.मि.अंतरावर श्रीशैल मंदिराची प्रतिकृती असलेले श्री.मल्लिकार्जुनचे हेमाडपंथी मंदिर आहे.मंदिरातील पिंड हि दक्षिणमुखी असून डोंगराच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर प्रमुख आकर्षण ठरत  आहे. समतेचे व एकात्मतेचे प्रतिक असलेले श्री.शंभू महादेवाची कावड हि भीम नगरातील कै.शंकर साधू गायकवाड यांच्या घरातून परंपरागत पद्धतीने निघते व भव्य भगवा ध्वज व जलकुंभ सहित हि लक्षवेधी कावड धावत श्रीच्या मंदिराकडे नेली जाते. हा सोहळा यात्रेतील प्रमुख आकर्षण असतो.तसेच सुतारवाड्यातील नंदिकोल व आष्टा कासार येथील चनमलय्या स्वामी यांच्या घरातून नंदिकोलची मंदिराकडे आगमन होते.
कार्यक्रमाची रूपरेषा :
दि.18 मार्च रोजी पहाटे श्रीच्या मूर्तीस अभिषेक व भक्तांचे दंडवत.
 सायं. 4 वाजता नंदिकोल व शंभू महादेवाची कावड व श्रीच्या पालखीची गावातून मंदिराकडे सवाद्य व भव्य मिरवणूक. व श्रीच्या पालखीचे मंदिरात आगमन प्रसंगी साखर,गुळ,खोबरे व नारळ यांची मुक्त उधळण व प्रसाद वाटप.
व सायं.९ वाजता मराठी नाटक “लफड्या शिवाय गाव नाही.”
तसेच दि.19 मार्च रोजी सायं.7 वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी,व रात्री 9 वाजता श्री.ह.भ.प.अमोल महाराज शेगांवकर यांचे कीर्तन व कालगीतुर्याचे गाणे,दि.20 मार्च रोजी स.9 वाजता देवेन्द्रप्पा सज्जन चिंचलसूर व शामलाबाई जानवाड यांचे कलगी तुर्याचे गाणे व 3 वाजता नामवंत मल्लांचे जंगी कुस्त्यांचा मुकाबला व रात्री 9 वाजता मराठी नाटक : “लफड्या शिवाय गाव नाही.”
दि.21 मार्च रोजी सायं.अचलेर येथी विरक्त मठातून श्रीच्या पालखी व नंदिकोल यांची गावातून मंदिराकडे भव्य मिरवणूक आयोजित केली असून सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री.मल्लिकार्जुन यात्रा पंच कमेटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post